बारामती- टिकटॉक अॅपने अनेकांना करमणुकीसह आर्थिक कमाईची करून दिली. मात्र, भारत-चीन सीमेवरील तणावानंतर भारताने चीनच्या जवळपास ५९ अॅपवर बंदी आणली त्यात टिकटॉकचाही समावेश आहे. मात्र, टिकटॉक बंद झाल्याने अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाहीतर काही जणांना अश्रू अनावर झाल्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे.. जो 'एस क्यू.. आर क्यू.. झेड क्यू.. 'बँड इज बँड...बुक्कीत टेंगुळ गुलीगत...' या अशा विनोदी डायलॉगसाठी टिकटॉकच्या माध्यमातून अल्पावधीतच नावारुपाला आला. तो टिकटॉक फॅन सुरज चव्हाण सध्या नाराज असल्याचे दिसून येत आहे.
जागतिक स्तरावर भारत चीन संबंध बिघडल्याने भारताने टिकटॉकसह विविध ॲपवर बंदी आणली आहे. टिकटॉक बंदीची घोषणा होताच बारामती तालुक्यातील मुर्टी गावातील टिकटॉक फेम सूरजला अश्रू अनावर झाले. याचे कारण असे की, टिकटॉक बंद झाल्याने केवळ आठवी पर्यंत शिकलेल्या सुरजचे टिकटॉक वर तब्बल १५ लाख फॉलोवर्स आहेत. त्याने टिकटॉकवर धुमाकूळ घातला होता. त्याच्या विशिष्ठ शैलीतील व्हिडिओने नेटकऱ्यांमध्ये तो अल्पावधीत नावारुपाला आला होता. भारत-चीन सीमेवर गलवान व्हॅलीत २० जवानांना वीरमरण आल्यानंतर तणावाच्या परिस्थितीत भारताने चीनचे ५९ अॅपवर बंदी आणली. त्यात टिकटॉकही बंद झाले. मात्र आता टिकटॉक बंद झाल्यामुळे' सुरज चव्हाणवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सुरजचे जगणेच निरस झाले आहे. सुरज म्हणतो; 'टिकटॉक बंद झाल्यामुळे मला करमत नाही, पहिल्यांदा खूप मजा यायची. टिकटॉक फेम असल्यामुळे अनेक जण दुकान उद्घाटनाला तरी बोलवायची, लोकं भेटायला यायची. पण, आता कुणी बोलावत नाही. एकदम सगळं कसं थांबून गेलंय. आता लय बेकार वाटतंय' अशी व्यथाच सुरजने आपल्या शैलीत मांडली. 'टिकटॉक बंद झाले त्यादिवशी मला रडूच कोसळले. आज वर्षातला पहिला असा दिवस आहे, ज्या दिवशी मी टिकटॉकवर व्हिडिओ तयार केला नाही, अशी खंतही त्याने यावेळी बोलून दाखवली.बँड इज बँड..! टिकटॉक फेम 'गुलीगत'वर बेकारीची कुऱ्हाड; १५ लाख होते फॉलोवर्स... - बुक्कीत टेंगुळ गुलीगत
टिकटॉक बंदीची घोषणा होताच बारामती तालुक्यातील मुर्टी गावातील टिकटॉक फेम सूरजला अश्रू अनावर झाले. याचे कारण असे की, टिकटॉक बंद झाल्याने केवळ आठवी पर्यंत शिकलेल्या सुरजचे टिकटॉक वर तब्बल १५ लाख फॉलोवर्स आहेत. त्याने टिकटॉकवर धुमाकूळ घातला होता. त्याच्या विशिष्ठ शैलीतील व्हिडिओने नेटकऱ्यांमध्ये तो अल्पावधीत नावारुपाला आला होता.
घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे त्याला पुढे शिक्षण घेता आले नाही. त्याला ५ बहिणी आहेत पैकी चौघींचे लग्न झाले आहे. तो सध्या एका बहिणीजवळ राहतो. लहानपणीच त्याचे मातृ आणि पितृछत्र हरपले आहे. जेव्हापासून टिकटॉक आले आणि त्यालाही व्हिडिओ बनविण्याचा छंद लागला यातून त्याला आर्थिक कमाई होऊ लागली. दररोज ५० ते १०० व्हिडिओ तयार करायचा. पण आता अचानक सगळं काही थांबून गेलं. आहे मला या टिकटॉकच्या माध्यमातून दिवसाला १ हजार रुपये मिळायचे. आता ते पण कायमचं बंद झालं आहे.' अशी खंत सुरज चव्हाणने व्यक्त केली आहे.