पुणे- माणिकडोह धरण परिसरात मासेमारी करत असताना अचानक बोट पाण्यात उलटल्याने ३ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गणेश साबळे, स्वप्निल साबळे आणि पंढरीनाथ मुंढे, अशी या आदिवासी मासेमारी करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान, या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे.
माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील केवाडी येथे मासे आणण्यासाठी निमगिरी व राजूर परिसरातील ८ जण शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास होडीने जात होते. दरम्यान, त्यांचा होडीत भार जास्त झाल्याने होडी उलटली. त्यातील तीन जण पाण्यात बुडाले तर पाचजण पोहून बाहेर येण्यात यशस्वी झाले. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात होता.