पुणे - नातेवाईकांकडे सांभाळण्यासाठी ठेवलेल्या एका ३ वर्षीय चिमुरड्याचा बांधकाम सुरू असलेल्या साईटवरील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. ही घटना पुण्याच्या कात्रज परिसरात मंगळवारी घडली. पिल्लू उर्फ समर सुलतान शेख, असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. त्याचे वडील सुलतान शेख यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पुण्यात नातेवाईकांकडे सांभाळण्यासाठी दिलेल्या चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू - police
घटनेच्या दिवशी मृत मुलाचे आई-वडील रमजाननिमित्त खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा समर याला घराजवळ राहणाऱ्या नातेवाईकांकडे सांभाळण्यासाठी ठेवले होते. दरम्यान सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास समर खेळत-खेळत घराजवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी गेला.

बांधकाम व्यावसायिक अनिल ज्ञानदेव खोपडे यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मृत मुलाचे आई-वडील रमजाननिमित्त खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा समर याला घराजवळ राहणाऱ्या नातेवाईकांकडे सांभाळण्यासाठी ठेवले होते. दरम्यान, सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास समर खेळत-खेळत घराजवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी गेला, आणि खेळता खेळता तो पाण्याच्या उघड्या टाकीत पडला. दरम्यान काही वेळाने समर दिसत नसल्याचे लक्षात येताच नातेवाईक महिलेने त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यांनी बांधकाम साईटवर जाऊन पाहिले असता तेथील पाण्याच्या टाकीत तो पडल्याचे दिसले. त्याला तत्काळ बाहेर काढून रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.