दौंड (पुणे)-सोलापूर महामार्गावर मस्तानी तलावाच्या विरुद्ध बाजूस एमक्युअर कंपनीचे कामगार घेऊन जाणारी बस, ट्रक आणि पीकअप अशा तीन वाहनांचा विचित्र झाला. या अपघातात बसमधील एक जण जागीच ठार झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे आणि पाटस पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. योगेश मुसमाळे असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वाहन चालकांची बाचाबाची अपघातास कारणीभूत
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोल नाक्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर मस्तानी तलाव आहे. या तलावाच्या विरुद्ध बाजूस आज (19 मे) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महामार्गावर कंपनी कामगारांना घेऊन जाणारी बस आणि केळी वाहतूक करणारा पिकअप यांच्या चालकात बाचाबाची झाली होती. दोन्ही वाहने महामार्गावर उभा होती. यावेळी पाठीमागून भरधाव येणारा ट्रक आणि या वाहनांचा अपघात झाला. या अपघातात बसमधील कंपनी कामगार बसमधून खाली पडला. जबर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तीन जण गंभीर जखमी