पिंपरी-चिंचवड (पुणे) - वाकड परिसरात गुरुवारी दिवसभरात तीन आत्महत्या झाल्या आहेत. यात एका संकगणक अभियंत्याचा समावेश आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या सर्व आत्महत्या नैराश्यातून झाल्या असाव्यात, असा अंदाज पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. प्रशांत नरेंद्र सेठ (वय- 32) असे संगणक अभियंत्याचे नाव आहे. कणिका नरेंद्र कुमार शर्मा (वय-33) आणि गेनदेव बाबुराव काशीद (वय- 40) आत्महत्या केलेल्या इतर दोघींचे नाव आहे.
वाकड परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी तीन आत्महत्या - pimpri chinchwad suicide
संगणक अभियंता प्रशांत यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये अस म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणक अभियंता प्रशांत हे मूळचे मध्यप्रदेश येथील असून हिंजवडीमध्ये कंपनीत कामाला होते.
संगणक अभियंता प्रशांत यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणक अभियंता प्रशांत हे मूळचे मध्य प्रदेश येथील असून हिंजवडीमध्ये कंपनीत कामाला होते. गुरुवारी दुपारी त्यांनी बेडरूममध्ये आत्महत्या केली. तेव्हा, पत्नी घरीच होती.
दुसऱ्या घटनेत 33 वर्षीय कणिका शर्मा यांनी आपल्या अडीच वर्षाच्या चिमुकल्यासमोर आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. तर, गेनदेव बाबुराव काशीद यांनी घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या सर्व घटना गुरुवारी दिवसभरात घडल्या असून वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.