पुणे - शहरातील घोरपडे पेठेतल्या एका तीन मजली जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशामक विभागाकडून सांगण्यात येत आहे.
पुण्यातील घोरपडे पेठेत इमारतीचा काही भाग कोसळला, कोणतीही जीवितहानी नाही - three story old building
इमारतीच्या तिसर्या मजल्यावर सात कुटुंबे राहत होती. त्या सर्वांना खाली आणण्यात आले आहे.
अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेतील राष्ट्र भूषण चौकातल्या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना रविवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेण्यात आली. तिसर्या मजल्यावर सात कुटुंबे राहत होती. त्या सर्वांना खाली आणण्यात आले.
लाकूड आणि माती वापरुन केलेले जुने बांधकाम असल्यामुळे इमारतीचा काही भाग पडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, आता पुणे महापालिकेमार्फत धोकादायक भाग पाडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.