महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Robbery Gang Arrested : अपघाताच्या नावाखाली लुटणाऱ्या टोळीला बेड्या; तीन जणांना अटक - अपघाताचा देखावा

तुमच्या हातून अपघात ( Scene of accident) झाल्याचे सांगून बाईकस्वाराला लुटणाऱ्या टोळीला दत्तवाडी पोलिसांनी अटक (robbery gang arrested) केली आहे. तपासात या टोळीने आतापर्यंत 40 जणांना लुटल्याचे (bike rider robbed) तपासात समोर आले. घटनेत आरोपींनी केतनकुमार यांना जबर मारहाण करत त्यांच्याकडून 20 हजार रुपये फोन पे द्वारे आणि 20 हजार रुपये एटीएममधून काढून घेतले. या घटनेनंतर खळबळ माजली.

Robbery Gang Arrested
अपघाताच्या नावाखाली लुटणाऱ्या टोळीला बेड्या

By

Published : Dec 16, 2022, 3:07 PM IST

पुणे : अपघाताच्या बनाव ( Scene of accident) करुन लुटणाऱ्या टोळीचा (Pune Crime) दत्तवाडी पोलिसांनी पर्दाफाश (robbery gang arrested) केला आहे. या टोळीने 40 लोकांना अशाच पद्धतीने लुटले (bike rider robbed) असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. (Latest news from Pune)

हे आहेत आरोपी :याप्रकरणी इरफान इस्माईल सय्यद (वय 30, रा. साडेसतरानळी रोड, माळवाडी हडपसर), शरद उर्फ डॅनी रावसाहेब आहिरे (वय 26, रा. म्हाळुंगे-नांदे,चांदे रोड), सविता लक्ष्मण खांडेकर (रा. गोपाळपट्टी मांजरी) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापैकी इरफान आणि शरद ऊर्फ डॅनी हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर दरोडा, जबरी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोघांनी आपल्या टोळीत लुटमारीसाठी एका महिलेचा देखील समावेश करून घेतला होता. तिला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अशी घडली घटना :10 डिसेंबरच्या रात्री केतनकुमार होवाळ (वय 30, रा. संतोषनगर कात्रज, मूळ – कराड) हे कामावरून घरी जाण्यास निघाले होते. तेवढ्यात सिंहगड रोड परिसरात मागून एक दुचाकी आली आणि तुमच्याकडून मागे 2 अपघात झाले आहेत. त्याचा 40 हजार रुपये खर्च दे अशी धमकी दिली. आरोपींनी केतनकुमार यांना जबर मारहाण करत त्यांच्याकडून 20 हजार रुपये फोन पे द्वारे आणि 20 हजार रुपये एटीएममधून काढून घेतले. या घटनेनंतर घाबरलेल्या केतनकुमारने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.


सापळा रचून तिघांना पकडले :गुन्हा दाखल झाल्यानंतर दत्तवाडी पोलिसांकडून तपास सुरू होता. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजद्वारे हा गुन्हा हडपसर परिसरात राहणार्‍या आरोपींनी केला असून, ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पथकाने सापळा रचून तिघांना पकडले. या टोळीने हडपसर, शिवाजीनगर, बंडगार्डन, वानवडी, हडपसर व मुंढवा परिसरात असे गुन्हे केले असून, चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपींकडून गुन्ह्याची कबूली :त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. यात विशेष बाब म्हणजे या टोळीचा मोरक्या असणाऱ्या इरफान सय्यद याच्या खात्यावर मागच्या 1 वर्षात वेगवेगळ्या 40 खात्यांवरून 9 लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे अजून किती लोकांना या टोळीने लुटले आहे याचा सखोल तपास सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details