दौंड (पुणे) -दौंड शहरातील तीन युवकांचा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मेरगळवाडी येथील तलावात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी ( Three people drowned in daund pune ) घडली. याबाबत माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. असरार अब्दुल अलीम काझी ( वय २१ ), करिम अब्दुल हादी काझी ( वय २० ), अतिक उझजमा फरिद शेख ( वय २०, सर्व रा. नवगिरे वस्ती, ता. दौंड ) अशी मयत युवकांची नावे आहेत.
फोन उचलत नसल्याने आला संशय -
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी (दि. ६) सायंकाळी ४ वाजता असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी, अतिक उझजमा फरिद शेख हे तिघे घरातुन बाहेर फिरण्यासाठी निघुन गेले होते. रात्री आठ वाजले तरी ते घरी आले नाहित म्हणून घराच्यांनी असरार अब्दुल अलीम काझी व करीम अब्दुल हादी काझी यांच्या मोबाईल वरती फोन लावला. मात्र फोन बंद होता. मग त्यांच्या सोबत गेलेला मित्र अतिक उझजमा फरिद शेख याच्या मोबाईलवर फोन लावला असता फक्त रिंग वाजत होती मात्र तो उचलत नव्हता. यामुळे अब्दुल अलीम काझी, असिम इस्माईल शेख , रफिक इकबाल सय्यद, कलिम सलीम सय्यद या सर्व जणांनी त्यांचा दौंड शहरास परिसरात शोध सुरू केला.
तलावाच्या काठाजवळ आढळले कपडे आणि बॅग -