महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-बंगळुरू महामार्गावर कारचा भीषण अपघात, तीघांचा जागीच मृत्यू - सूरज राजेंद्र मांजरे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली.

मुंबई -बंगळुरू महामार्गावर कारचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

By

Published : Jul 7, 2019, 10:27 AM IST

पुणे - मुंबई -बंगळुरू महामार्गावर देहूरोड येथे आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. स्विफ्ट कारची उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातात 1 जण गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आहे. हा अपघात पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास झाला.

मुंबई -बंगळुरू महामार्गावर कारचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

पराग हेरगांवकर, सूरज राजेंद्र मांजरे, अभिषेक शर्मा, अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात असणाऱ्या स्विफ्टने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. यावेळी स्विफ्ट भरधाव वेगात असल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे.

जखमीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, देहूरोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर दाखल झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details