महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात; पती, पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू - पुणे अपघात

नाशिक-पुणे महामार्गावर जांबुत फाटा येथे दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातात भटकळवाडी (ता. जुन्नर) येथील पती, पत्नीसह त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

पुणे अपघात
पुणे अपघात

By

Published : Jun 19, 2021, 7:53 AM IST

पुणे- नाशिक-पुणे महामार्गावर जांबुत फाटा येथे दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातात भटकळवाडी (ता. जुन्नर) येथील पती, पत्नीसह त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

अपघातात राजेश निवृत्ती लेंडे (वय ३०), त्यांची पत्नी सुरेखा (वय २७), मुलगा यश यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

पुतणीचा विवाह असल्याने राजेश लेंडे हे पत्नी सुरेखा व मुलगा यश यांना नारायणगाव येथे कपडे खरेदीसाठी घेऊन गेले होते. परत येत असताना पुणे नाशिक महामार्गावर जांबुत फाटा येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (एमएच १४ जीएच २२०६) मागून धडक दिली. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे भटकळवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details