पुणे- भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील महाडच्या बाजूला वरंध गावाजवळील नागमोड्या वळणावर ट्रकने पीकअपला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे 6 वर्षाच्या लहान मुलीसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर दोन्ही वाहने दरीत कोसळल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळछ्या सुमारास घडला आहे.
एक पीकअक जीप महाडवरून भोरला येत होती. त्यावेळी वरंध गावाजवळील नागमोडी वळणावर भोर बाजूकडून आलेला ट्रक (क्रमांक एम एच 12 एफ सी 8199) हा वंरधा घाटतून महाडच्या बाजूला घाट उतरत होता. ट्रकने समोरून जीपला धडक दिल्याने दोन्हीही वाहने खोल दरीत कोसळली. पीकअप जीपमधील चालक आणि त्याची 6 वर्षांची मुलगी व ट्रकचालक या तीघांनाही ग्रामस्थांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढले. सर्व जखमींना महाडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे.