पिंपरी-चिंचवड (पुणे) -शहरातील पुनावळे परिसरात भरधाव चारचाकी दुकानात शिरल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चारचाकीतील तीन अल्पवयीन मुले किरकोळ जखमी झाले आहेत, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. मात्र, या घटनेत दुकान, चारचाकी वाहन तसेच उभे असलेल्या दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भरधाव कार दुकानात शिरली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पुनावळे परिसरात भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुकानात शिरून अपघात झाला आहे. यात तीन दुकानांचे व दुकानासमोर उभ्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 22 डिसें.) दुपारी साडेतीनच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.