पुणे- पुणे तिथे काय उणे असे नेहेमी म्हटले जाते आणि याची प्रचिती वेळोवेळी येतच असते. पुणे शहरात काहींना काही वेगळ्या संकल्पना, पुणेरी डॉयलॉग, पुणेरी कट्टा सुरूच असतात. अशीच काहीशी वेगळी कल्पना घेऊन उच्च शिक्षित तरुणांनी एकत्र येत जॉब न करता वेगळा व्यवसाय सुरू केला. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग अनेकांना दररोरोज सकाळी उठल्यानंतर चहाबरोबर चपाती लागते. अशीच या चहा चपातीची आवड पाहता अक्षय भैलूमे, अक्षय चव्हाण, धनश्री पाटील या तीन उच्च शिक्षित तरुणांनी एकत्र येत चहाचपातीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या भन्नाट कल्पनेला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद देखील मिळत आहे.
का सुरू केली चहा चपाती ?
पुणे शहरात ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. ग्रामीण भागात रोज सकाळी चहाबरोबर चपाती खाल्ली जाते. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना अशा पद्धतीची चहा-चपाती मिळत नाही. त्यामुळे त्यांनी मिळेल ते खावे लागत होते. त्यानंतर आम्ही तिघांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता महाविद्यालायजवळ चहा-चपातीचे हॉटेल सुरू केले, अशी प्रतिक्रिया अक्षय भैलूमेने दिली.
दररोज 40 हून अधिक चपाती विकले जातात