पुणे- शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावात भिल्लवस्ती येथील झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीची तीव्रता इतकी भीषण होती की आगीत होरपळून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लाला आनंद गावडे (वय ३४), दादा लाला गावडे (वय ४) आणि प्रांजल अरुण पवार (वय ३) अशी आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
पुण्यातील भिल्लवस्तीतील घराला आग; वडिलांसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू - शिरुर
अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेने शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रहात्या घराला आग
आमदाबाद गावातील भिल्लवस्ती येथील भर उन्हात दुपारच्या सुमारास अचानक राहत्या घराला आग लागली. घरामध्ये दोन लहान मुलांसह वडील होते. अचानक लागलेल्या आगीची तीव्रता जास्त असल्याने बचाव होत नसल्याने तिघांचाही आगीत होरपळुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
दरम्यान, अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेने शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Last Updated : Apr 29, 2019, 7:53 PM IST