महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आशादायक! पिंपरी-चिंचवडमधील 'त्या' तिघांची दुसरी टेस्ट आली निगेटिव्ह, आज होणार सुटका - पुणे

पिंपरी चिंचवडमधील तीन रुग्णाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांचे मनोबल वाढले. त्या तिघांना आज रुग्णालयातून सुटी मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे.

pcmccorna
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय

By

Published : Mar 27, 2020, 9:54 AM IST

पुणे- पिंपरी-चिंचवडमधील पहिले तीन जण कोरोनामुक्त झाल्याचे निष्पन्न झाले आहे. १४ दिवसांनंतरच्या दोन टेस्टमध्ये हे तिघेजण निगेटिव्ह आले आहेत. त्यांना आज डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. शहरात एकूण १२ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. पैकी, तीन जण बरे झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका
पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यानंतर राज्य आणि महापालिका प्रशासनाने जागे होत अनेक उपाययोजना केल्या. दरम्यान, पुण्यातील करोना बाधित दाम्पत्याच्या संपर्कात आल्याने पिंपरी-चिंचवडमधील तिघांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती १० मार्चला समोर आली. तिघांवरही महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्यांच्यावर उपचार केले. त्यानुसार गुरुवारी त्यांची १४ दिवसानंतरची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली. आज पुन्हा त्यांची टेस्ट येणार असल्याने अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे लागलेल्या होत्या. दरम्यान, आजची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने सर्वत्र आनंदी वातावरण असून डॉक्टरांचे मनोबल वाढलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details