महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर शिवलिंगात साकारला तिरंगा

देशात 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरच्या शिवलिंगात तिरंगा बेलफुलांनी रेखाटण्यात आला आहे.

भीमाशंकर मंदिर
भीमाशंकर मंदिर

By

Published : Aug 15, 2020, 7:15 PM IST

पुणे - देशात 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरच्या शिवलिंगात तिरंगा बेलफुलांनी रेखाटण्यात आला आहे. मात्र, कोरोना महामारीच्या संकटामुळे भिमाशंकर मंदीर भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे.

आज स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना कोरोनाच्या महामारीचे संकट असल्याने मंदिरे शाळा, सार्वजनिक ठिकाणे बंद आहे. अशात देवदर्शन बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, परंपरेनुसार देवस्थानच्या माध्यमातून पुजा आरती परंपरेनुसार सुरू आहे. आज स्वातंत्र्य दिनाचे औत्सुक्य साधून भिमाशंकर येथील मुख्य शिवलिंगाला बेल व अस्टरच्या रंगबेरंगी फुलांनी तिरंग्याची प्रतिमा साकारण्यात आली.

सध्या श्रावणमास सुरू आहे. श्रावणमासातील सर्व पुजा, आरती नित्यनियमाने पाच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत होत आहे. मात्र, भिमाशंकर भाविकांविना ओस पडले आहे. आज देशात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना भिमाशंकरच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील शिवलिंगावर पुजारी, गुरव स्थानिकांच्या संकल्पनेतून शिवलिंग बेलफुलांनी तिरंग्याच्या रुपात सजवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details