महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिंगवे येथे मीना नदीपात्रात पोहायला गेलेली तीन मुले पाण्यात बुडाली, शोधकार्य सुरु - शिंगवे

आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावात मीना नदीवर पोहायला गेलली ३ मुले पाण्यात बुडाल्याची घटना आज (रविवार) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. मुलांचा शोध सुरू आहे. मात्र, अंधार झाल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण होत आहे.

मुलांचा शोध घेताना

By

Published : Sep 29, 2019, 9:33 PM IST

Updated : Sep 29, 2019, 11:49 PM IST

पुणे - आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावात मीना नदीवर पोहायला गेलेली ३ मुले पाण्यात बुडाल्याची घटना आज (रविवार) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. मुलांचा स्थानिक नागरिकांकडून नदीच्या पात्रात शोध सुरु आहे. वैभव चिंतामण वाव्हळ, यश राजेंद्र वाव्हळ, श्रेयश सुधीर वाव्हळ अशी नदीत बुडालेल्या तीन मुलांची नावे आहेत.

तीन मुले पाण्यात बुडाली

आज दुपारच्या सुमारास शाळेला सुट्टी असल्याने शिंगवे गावातील १० वीत शिक्षण घेणारी ही ३ मुले मीना नदीमध्ये पोहण्यासाठी गेली होती. मात्र, नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तीनही मुले पाण्यात बुडाली. घटस्थापनेच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने शिंगवे गावावरती शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - आंबेगाव तालुक्यात 'कांदा' चोरट्यांचा धुमाकूळ


आंबेगाव तहसीलदार, मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मीना नदीच्या पात्रात मुलांचा शोध सुरु आहे. मात्र, परिसरात अंधार असल्याने शोधकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे.

हेही वाचा - अज्ञाताने कांदा चाळीत युरिया टाकल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान; जुन्नरमधील घटना

Last Updated : Sep 29, 2019, 11:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details