महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विजेच्या तारा अंगावर पडून तीन म्हशींचा मृत्यू; चाकणमधील घटना - चाकण दुर्घटना

चाकण जवळील वासुली गावालगत माळरानावर विजेच्या तारा तुटल्याने विजेचा धक्का लागून तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतक-याचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

चाकण येथे विजेच्या तारा अंगावर पडून तीन म्हशींचा मृत्यु झाला

By

Published : Aug 3, 2019, 11:58 PM IST

पुणे -सध्या दिवसरात्र सुरू असलेल्या पावसामुळे विविध दुर्घटना घडत आहेत. चाकण जवळील वासुली गावालगत माळरानावर विजेच्या तारा तुटल्याने विजेचा धक्का लागून तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

चाकण येथे विजेच्या तारा अंगावर पडून तीन म्हशींचा मृत्यू झाला
वासुली येथील माळरानावर कोंडीबा सावळेराम शेळके या शेतकऱ्याच्या म्हशी चरत होत्या. बाजुलाच असलेल्या विजेच्या खांबावरील विद्युत प्रवाहीत तारा म्हशींच्या अंगावर पडल्या. त्यामुळे तीन म्हशींचा शॉक लागुन जागीच मृत्यू झाला. शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान महसुल विभागाकडुन घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू असणारे खांब, रोहित्र धोकादायक असल्याने अशा दुर्घटना होत आहेत. त्याकडे महावितरण दुर्लक्ष करीत आहे, असे नागरिकांचे म्हणने आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details