महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये 24 वाहनांची तोडफोड; तीन जण पोलिसांच्या ताब्यात - सांगवी गुन्हे बातमी

पिंपरी चिंचवड मधील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात तिघांनी वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

ambulance
ambulance

By

Published : Jul 23, 2020, 2:13 PM IST

Updated : Jul 23, 2020, 4:31 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) -येथील सांगवी परिसरात अज्ञात तिघांनी 24 चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे. यात स्कूल बस, रुग्णवाहिकेचा देखील समावेश असून सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान केले असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना बुधवारी (दि. 22 जुलै) रात्री उशिरा घडली असून सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 24 वाहनांची तोडफोड...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध परिसरात अज्ञात तिघांनी मद्यधुंद अवस्थेत लोखंडी रॉडने वाहनांची तोडफाड केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

दहा दिवसांपासून शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 24 तास पोलीस बंदोबस्त असतानाही तोडफोडीची घटना घडली आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.

नुकसानग्रस्त वाहन
Last Updated : Jul 23, 2020, 4:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details