पुणे - भारतीय सैन्य दलात शिपाई पदाची नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणांची आर्थिक फसवणूक करण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेसह मिलीटरी इंटिलिजन्सच्या संयुक्त विभागाने अटक केली. टोळीमध्ये लष्कारातील एका जवानासह दोघांचा समावेश आहे.
वेनिंसग लालिंसग रावत (वय 45 वर्षे), रवींद्र राठोड (दोघेही मूळ रा. राजस्थान) आणि लष्करी जवान जयदेवसिंह परिहार, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्य भरतीच्या लेखी परीक्षेत मुलांची फसवणूक करून पैसे लुबाडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीची माहिती मिलीटरी इंटलिजीन्सला मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांना माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पथक तयार करुन वेनसिंग, रवींद्र आणि हवालदार जयदेवसिंहला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.