महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हुक्क्याची होमडिलिव्हरी करणाऱ्या तिघांना पुण्यात अटक

हुक्क्याची ऑनलाईन विक्री करून त्याची होमडिलिव्हरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. मित विजय ओसवाल (वय-१९) रॉयल जयराम मधुरम (वय-२८) आणि परमेश महेश ठक्कर (वय २४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

hookah in Pune
पुण्यात हुक्क्याची होमडिलिव्हरी करणाऱ्या तिघांना अटक

By

Published : May 14, 2020, 5:08 PM IST

पुणे - लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण होऊन बसले असतानाच पुण्यात मात्र एक वेगळाच प्रकार उघडकीस आला. हुक्क्याची ऑनलाईन विक्री करून त्याची होमडिलिव्हरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. मित विजय ओसवाल (वय-१९) रॉयल जयराम मधुरम (वय-२८) आणि परमेश महेश ठक्कर (वय २४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'व्हाट्स हॉट' या संकेतस्थळावर ऑनलाईन हुक्का विक्री केली जात होती. हुक्का विक्रीची जाहिरात करत मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर संपर्क करणाऱ्या व्यक्तीला होम डिलिव्हरी दिली जात होती. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने संपर्क साधला आणि होम डिलिव्हरीची मागणी केली. त्यानंतर होम डिलिव्हरी घेऊन आलेल्या व्यक्तीला अटक केली. कोंढव्यातील तालाब चौक याठिकाणी सापळा रचून ही कारवाई केली. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांकडून 6 हुक्का पॉट, सहा पाकीट तंबाखूजन्य फ्लेवर, चार मोबाईल फोन दोन मोपेड गाड्यांसह 84 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान हुक्का डिलीव्हरीच्या अनेक संकेतस्थळ उपलब्ध आहेत. या संकेतस्थळांवर विक्रेत्याचे मोबाईल नंबर देण्यात आलेत. त्याचबरोबर हजारापासून पुढं ग्राहकानुसार जास्त पैसे घेऊन हुक्का घरपोच डिलिव्हरी केला जातो.

ABOUT THE AUTHOR

...view details