पुणे -लष्करात भरतीसाठी घेतला जाणारा लेखी पेपर मिळवून देतो, असे सांगून पैसे उकळणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर अन्य एका साथीदाराचा शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी राज्यभरातील अनेक तरुणांना गंडा घातला असल्याचे चौकशीतून उघडकीस आले आहे.
अली अख्तर आणि महेंद्र सोनवणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा आणखी एक साथीदार आझाद खान यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गणेश साळुंके (वय २१ , रा. डोंगरसनी, तासगाव ) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
लष्कर भरतीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक; फोडणार होते पेपर?
पुण्यात होणाऱ्या रिलेशन आर्मी भरती परीक्षेचे पेपर फोडून तिन्ही आरोपी संपर्कातील उमेदवारांना पुरवणार असल्याची माहिती मिलिटरी इंटेलिजन्सला मिळाली होती. त्यानुसार इंटेलिजन्सने याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
परीक्षेच्या आदल्या दिवशी फोडणार होते पेपर-
पुण्यात होणाऱ्या रिलेशन आर्मी भरती परीक्षेचे पेपर फोडून तिन्ही आरोपी संपर्कातील उमेदवारांना पुरवणार असल्याची माहिती मिलिटरी इंटेलिजन्सला मिळाली होती. त्यानुसार इंटेलिजन्सने याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अली अख्तर आणि महेंद्र सोनवणे यांना पकडले. चौकशीत त्यांनी अनेक तरुणांना परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका फोडून देण्याचे सांगत लाखो रुपये घेतल्याची कबुली दिली.
याबरोबरच या आरोपींनी अनेक विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे घेऊन फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चार तपास करीत आहेत.