पुणे - राज्यात काही भागांमध्ये घोंगावणाऱ्या बर्ड फ्लूने पुणे जिल्ह्यात शिरकाव केला असून मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावातील अरुण राक्षे यांच्या पोल्ट्रीमध्ये अचानक कोंबड्या दगवल्या होत्या. त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तेथील साडेतीन हजार पक्षी नष्ट करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली आहे. दरम्यान, आणखी 26 हजार 500 पक्षी नष्ट करण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.
कोंबड्या दगावल्याने बर्डफ्लू झाल्याचे निष्पन्न
डॉ. शिवाजी विधाटे म्हणाले, की मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात अरुण राक्षे यांच्या पोल्ट्रीमध्ये अचानक कोंबड्या दगावल्या होत्या. त्याचे नमुने प्रयोग शाळेला पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. येथील परिसरातील पक्षी नष्ट करण्याची परवानगी जिल्ह्याधिकारी यांनी दिली आहे. त्यानुसार साडेतीन हजार पक्षी नष्ट केले आहेत. पक्षी गाडण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. ती शोधली असून खड्डा करण्याचे काम सुरू आहे, अे ते म्हणाले.
'अफवांवर विश्वास ठेवू नये, मांसाहार करावा'