महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरीत खुन्नसने बघण्यावरून तरुणाचा खून; गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग

पिंपरी-चिंचवडमध्ये खुन्नसने पाहण्यावरून झालेल्या वादात एका तरुणाचा खून झाला आहे. ही घटना चिंचवड परिसरात घडली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी
आरोपी

By

Published : Sep 8, 2021, 3:21 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे)- पिंपरी-चिंचवडमध्ये खुन्नसने पाहण्यावरून झालेल्या वादात 20 वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. ही घटना चिंचवड परिसरात घडली आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गणेश याड्रमी, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी अमेय उर्फ बंटी शांताराम ठाकरे, आकाश जालिंदर गायकवाड, प्रकाश जालिंदर गायकवाड, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, दहावीत शिक्षण घेणाऱ्या आणि दहावी उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यात सहभाग आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गणेशचा मित्र हितेश पाटील यांचे एका अल्पवयीन मुलाशी एकमेकांना पाहण्यावरून किरकोळ वाद झाले होते. ते एकमेकांचा बदला घेण्याची वाट पाहात होते. मृत गणेश इतर काही मित्र आणि आरोपी हे समोरासमोर आले. तेव्हा, आरोपी बंटी ठाकरे याने बदला घेण्याच्या हेतून गणेश थेट छातीतच चाकू खुपसला यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे. गंभीर बाब म्हणजे इतर अल्पवयीन आरोपी हे दहावीत शिक्षण घेत आहेत तर काही जण दहावी उत्तीर्ण झालेत. दरम्यान, या गंभीर घटने प्रकरणी चिंचवड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा -मुलाच्या वाढदिवसानिमित्त लॉकरमधून आणलेले तब्बल शंभर तोळे सोने चोरट्यांकडून लंपास

ABOUT THE AUTHOR

...view details