शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांची मांदियाळी - बारामतीत दिवाळी पाडवा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिवाळीच्या पाडव्या दिवशी तिथे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार करतात. यावेळी भेटीसाठी आलेली प्रत्येक व्यक्ती पवारांसोबत हस्तांदोलन करण्याबरोबरच त्यांच्यासोबत फोटो काढण्याची सुवर्ण संधी सोडत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. गेल्या अनेक वर्षापासून शरद पवारांना भेटण्यासाठी राज्याच्या कान्याकोप-यातून हजारो लोक गोविंदबागेत येत असतात.
पुणे- राज्यासह संपूर्ण देशात दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. पाच दिवस साजऱ्या होणार्या या उत्सवात दिवाळी पाडव्याला विशेष महत्त्व असते. देशभरातील अनेक मान्यवर कुटुंब आपपाल्यापरीने दिवाळी, पाडवा साजरा करतात. मात्र, बारामतीत पवार कुटुंबीयांकडून साजरा केला जाणारा पाडवा अनेक अर्थाने वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे पाहायला मिळते. पाडव्या दिवशी शरद पवार संपूर्ण कुटुंबासह बारामतीच्या गोविंद बाग निवासस्थानी उपस्थित असतात. त्यामुळे राज्याभरातून अनेक कार्यकर्ते, सगेसोयरे, नातेवाईक दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबागमध्ये दाखल होतात.