महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Katebaras Yatra : हजारो भाविकांनी अनुभवला काटेबारसीचा थरार; तीनशे वर्षापासून सुरू आहे परंपरा - devotees experienced thrill of Katebarsi

पुण्यातल्या पुरंदरमधल्या गुळुंचे गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार ( Katebaras Yatra with great excitement ) पडली.

Katebaras Yatra
काटेबारस यात्रा

By

Published : Nov 6, 2022, 12:52 PM IST

पुणे : पुण्यातल्या पुरंदरमधल्या गुळुंचे गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार ( Katebaras Yatra with great excitement ) पडली. ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रेनिमित्त हजारो भक्तगणांनी बाभळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यांमध्ये उड्या घेत आपला देव भेटीचा मार्ग खुला केला. काटेबारस यात्रात बाभळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यांमध्ये उड्या घेण्याची तीनशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून ही परंपरा चालत आली आहे.


तीनशे वर्षपेक्षा जास्त दिवसापासून ही परंपरा :भगवान शंकर म्हणजेच ज्योतिर्लिंग आणि देवाची बहीण यांच्यात वाद झाला, बहीण रुसून गेली. देव तिला आणायला गेले. पण बहीण यायला तयार नव्हती. आपल्या पश्र्चाताप व्यक्त करण्यासाठी ज्योतिर्लिंग देवाने काट्यांच्या ढीगामध्ये स्वतःला उघड्या अंगाने झोपून दिले. देवाची ही अवस्था पाहून, बहिणीला त्याची दया आली आणि बहीण भावा बरोबर घरी आली आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली अशी आख्यायिका सांगितले जाते. तीनशे वर्षपेक्षा जास्त दिवसापासून ही परंपरा या ठिकाणी सुरू असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.

काटेबारस यात्रा


ढिगात उड्या मारल्याने अंगात फारसे काटे टोचत नाहीत : या ढिगात उड्या मारल्याने अंगात फारसे काटे टोचत नाहीत किंवा जर टोचलेच तरी त्यापासून मोठी जखम कधीही झाली नाही. असे काट्यांमध्ये उघड्या घेणारे भक्तगण सांगतात.

ABOUT THE AUTHOR

...view details