पुणे - मराठा आंदोलनाबाबत माझी आजही सामंजस्याची भूमिका आहे. सध्या कोरोना नियंत्रणासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केलं पाहिजे. आपण जगलो तरच पुढे मराठा आरक्षणासाठी लढणार आहोत. म्हणून कोणीही, कुठलीही अशी गोष्ट करू नये ज्याने समाजात उद्रेक होईल. आणि उद्रेकच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्याचा त्रास होईल. ही वेळ मोर्चे काढायची नाही तर ही वेळ सामान्य माणसे जगण्याची वेळ आहे. मी मराठा आरक्षणाबाबत निश्चितच आशावादी आहे आणि मार्ग निघेपर्यंत मी शांत बसणार नाही. असं मत यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
माझी भूमिका तीच नकळत मराठा समाजाची भूमिका -
मराठा समाजात देखील संभ्रम अवस्था आहे. नेमके आपण पुढे कसे जायचे, काय करायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने जी होर्डिंग दिली आहे. त्याबाबतचे पुढचे ऍक्शन काय असेल, राजकीय वातावरण खूप गरम झाला आहे. अशा वातावरणात समाजाची भावना ही आपण सांगावी म्हणून मी काल ट्विट केले होते. लवकरच मी माझी भूमिका स्पष्ठ करणार आहे. माझी भूमिका म्हणजे समाजाची भूमिका असणार आहे. समाजातील अनेक घटक, तसेच अनेक विद्वान यांच्याशी माझी चर्चा होणार आहे. आणि मगच थोड्याच दिवसात मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. माझी भूमिका ही शिवाजी महाराज, शाहू महाराज यांची भूमिका असते आणि नकळत तीच मराठा समाजाची भूमिका असते. असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे.