बारामती - बिल्डरांचा प्रीमियम कमी करण्यासंदर्भात काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेली वादावादी ही जनहितासाठी होती, की स्वतःहिता होती, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. यासंदर्भातही अनेक चर्चा समोर येत आहेत. याचा फायदा ग्राहकांना झाला पाहिजे. मात्र, जनतेचे नाव समोर करून बिल्डरांचा फायद करायला हे सरकार निघाले आहे, अशी टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
लक्ष्मी-नृसिंह मंदिराला भेट -
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथील प्रसिद्ध लक्ष्मी-नरसिंह मंदिराला आज सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री लक्ष्मी-नृसिंहाची पुजा करून दर्शन घेतले. मंदिराच्या सभामंडपात भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा इंदापूर तालुक्यातील जनतेच्यावतीने सत्कार केला. तसेच श्री लक्ष्मी नृसिंंह देवस्थान ट्रस्टच्यावतीने विश्वस्त अभय वांकर यांनीही त्यांचा सत्कार केला.