पुणे - पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तीन कोरोनाबाधित रुग्णांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. यामध्ये तेरा महिन्याच्या चिमुरडीचा समावेश आहे. पुण्याच्या वारजे येथील या चिमुरडीला 4 मे रोजी कोरोनाची बाधा झाल्यामुळे ससून रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिला इतरही आजार होते. उपचार सुरू असताना आज सकाळी साडेसात वाजता तिची प्राणज्योत मालवली. याशिवाय आज दिवसभरात ससून रुग्णालयात 82 आणि 37 वर्षीय रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ससून रुग्णालयातील तेरा महिन्याच्या कोरोनाबाधित चिमुरडीचा मृत्यू - पुणे कोरोना मृत्यू
पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तीन कोरोनाबाधित रुग्णांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. यामध्ये तेरा महिन्याच्या चिमुरडीचा समावेश आहे. पुण्याच्या वारजे येथील या चिमुरडीला 4 मे रोजी कोरोनाची बाधा झाल्यामुळे ससून रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
ससून रुग्णालयातील तेरा महिन्याच्या कोरोनाबाधित चिमुरडीचा मृत्यू
आतापर्यंत ससून रुग्णालयात 394 पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले आहेत. त्यातील 76 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 89 रुग्णांचा आतापर्यंत एकट्या ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर कोरोनाबाधित 2 हजार 380 रुग्ण आहेत. त्यातील एकूण 143 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.