पुण्यात कडक निर्बंध, दुपारी ४ नंतर ही दुकाने बंद, जाणून घ्या नवीन नियमावली - पुणे लॉकडाऊन न्यूज
कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे यापूर्वी पुणेकरांना दिलासा देताना शासनाने काही निर्बंध हटवले होते. या नवीन नियमानुसार पुणे शहरातील दुकाने संध्याकाळी सात वाजेपर्यंत तर हॉटेल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.
पुणे -कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरीएन्टचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहर आणि परिसरात आधीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना आजपासून (सोमवारपासून) नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. या नवीन नियमानुसार दुपारी चारनंतर पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील.
कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे यापूर्वी पुणेकरांना दिलासा देताना शासनाने काही निर्बंध हटवले होते. या नवीन नियमानुसार पुणे शहरातील दुकाने संध्याकाळी सात वाजेपर्यंत तर हॉटेल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरीएन्टच्या वाढता प्रादुर्भाव पाहता या नियमांत बदल करण्यात आला आहे.
काय राहणार सुरू
:- आजपासून (सोमवार) पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
:- अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील.
:- रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने सुरू राहतील. शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.
:- मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.
:- लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणं आवश्यक
:- पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी
:- अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
:- उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत परवानागी
:- खाजगी कार्यालय कामाच्या दिवशी 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत, तर अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालय शंभर टक्के क्षमतेने.
कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.