महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thieves Steal 25 Lakh : प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेले, चोरट्याने डाव साधून 25 लाख लांबवले - thieves steal jewellery 25 lakh in Pune

चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेल्यावर घरात चोरी झाल्याची घटना पुण्यात ( robbery after going to church to pray ) घडली. पुण्यात न्याती व्हिक्टोरिया सोसायटीत 25 लाखांची चोरी ( thieves steal jewellery 25 lakh in Pune ) झाली. 12 हजार रोकड, हिरेजडीत दागिने असा २४ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे.

thieves steal 25 lakh
पुण्यात चोरी

By

Published : Dec 26, 2022, 4:30 PM IST

पुणे : जगभरात काल नाताळ सण उत्साहात साजरा केला जात होता. मात्र एका कुटुंबावरती प्रार्थनेसाठी गेल्यानंतर भलताच प्रसंग उद्भवला असून ते प्रार्थनेला चर्चमध्ये गेले आणि त्यांच्याच घरातले 25 लाख रुपये चोरीला ( thieves steal jewellery 25 lakh in Pune ) गेले. पुण्यातील महंमदवाडी भागातील एक कुटुंब प्रार्थना करण्यासाठी चर्चला गेल्यानंतर हा प्रकार घडला.



न्याती व्हिक्टोरिया सोसायटी : तक्रारदार महिला या महंमदवाडी येथील न्याती व्हिक्टोरिया सोसायटीत ( robbery at Nyati Victoria Society ) राहतात. याच ठिकाणी असलेल्या त्यांच्या सदनिकेत चोरट्यांनी चोरी केली ( robbery after going to church to pray ) आहे. तक्रारदार महिला आणि तिचे कुटुंबीय 24 डिसेंबरच्या रात्री प्रार्थना करण्यासाठी चर्चमध्ये गेले होते. हीच संधी साधून चोरटे सदनिकेची लोखंडी जाळी उचकटून घरात शिरले आणि कपाट उचकटून 12 हजार रोकड, हिरेजडीत दागिने असा २४ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज लांबवला.

घरी परतल्यावर चोरी उघडकीस :मध्यरात्री 1 च्या सुमारास या तक्रारदार महिला आणि त्यांचे कुटुंबीय प्रार्थना केल्यानंतर घरी परतले. तेव्हा हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर महिलेने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरी करून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण देखील ताब्यात घेतलं आहे. पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details