महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Daund Murder News : बीएसएनएलच्या कार्यालयात चोरांनी केला सुरक्षा रक्षकाचा खून - Security Guard Murder in Daund

सुरक्षारक्षकाने चोरांना विरोध केल्याने त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना दौंड शहरातील बीएसएनएल कार्यालयात घडली. याबाबत दौंड पोलिस ठाण्यात ( Daund Police Station ) अज्ञात चोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश ठाकूरदास सुखेजा (वय 60 ) असे या हत्या झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

daund crime
daund crime

By

Published : Jul 26, 2022, 10:22 PM IST

दौंड - दौंड शहरातील बीएसएनएलच्या कार्यालयात केबल चोरी ( Cable theft in Daund BSNL office ) करण्यासाठी आलेल्या चोरांनी सुरक्षा रक्षकाचा खून ( Security Guard murder case in Daund BSNL Office ) केला. सुरक्षारक्षकाने चोरांना विरोध केल्याने त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती कळली. याबाबत दौंड पोलिस ठाण्यात ( Daund Police Station ) अज्ञात चोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोक्यात धारदार हत्यारांनी वार -- प्रकाश ठाकूरदास सुखेजा (वय 60 ) असे या हत्या झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे . ते मंगळवारी रात्रीच्या सुमारास बीएसएनएल कार्यालय परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी अनोळखी दोन ते तीन व्यक्ती बीएसएनएल कार्यालयातील वायरची चोरी करून जाऊ लागले. सुरक्षा रक्षकाने चोरांना विरोध केल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात धारदार हत्यारांनी वार करून त्यांचा खून केला. याबाबत मृत सुरक्षारक्षक प्रकाश सुखेजा यांचा मुलगा मनोज प्रकाश सुखेजा यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दौंड पोलिसांची सक्रियता - या घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस , दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास दौंड पोलिस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details