महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरुर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरे फोडली, शेतकऱ्यांना मारहाण

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, गुरवारी पहाटेच्या सुमारास कवठे येमाई व सविंदणे या दोन गावांमध्ये चोरट्यांनी दोन घरे फोडली. यामध्ये चोरट्यांनी घरात झोपलेल्या शेतकऱ्यांना जबर मारहाण देखील केली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे.

चोरीचे दृष्ये

By

Published : Aug 8, 2019, 11:53 AM IST

पुणे -जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, गुरवारी पहाटेच्या सुमारास कवठे येमाई व सविंदणे या दोन गावांमध्ये चोरट्यांनी दोन घरे फोडली. यामध्ये चोरट्यांनी घरात झोपलेल्या शेतकऱ्यांना जबर मारहाण देखील केली आहे. यामुळे परिसरात तनावाचे वातावरण तयार झाले आहे.

शिरुर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ
चोरट्यांनी घरात झोपलेल्या शेतकऱ्यांना मारहाण करत घरातील अडीच तोळे सोनं, एक दुचाकी आणि काही रोख रक्कम चोरून नेली आहे. यामध्ये संगिता पंचरास, शुक्राज पंचरास आणि संदीप पडवळ गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या चोरीच्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांपुढे असणार आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे, पुणे जिल्ह्यातील अनेक कुटुंब उत्तर पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये झोपडी बांधून राहत आहेत. मात्र, या लोकांकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने, ही कुटुंबे चालतात कशी असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत. तर पोलिसांनी खबरदारी घेत या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे न केल्यास या परिसरात मोठ्या घातपाताची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details