महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तामिळनाडूतले चोरटे मारत होते पिंपरी-चिंचवडमधील मोबाईलवर डल्ला; 60 मोबाईल, 14 लॅपटॉप जप्त - Thieves Gang Arrested

Thieves Gang Arrested : तामिळनाडू येथून पिंपरी-चिंचवड शहरात येऊन मोबाईल आणि लॅपटॉपची चोरी करणाऱ्या चोरांच्या टोळीला पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने अटक केली आहे. (Gang of thieves in TamilNadu) चोरांकडून 14 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी विविध पोलीस ठाणे हद्दीत आतापर्यंत 23 गुन्हे केल्याचे उघडकीस आले.

Thieves Gang Arrested
14 लॅपटॉप जप्त

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 10:16 PM IST

पिंपरी चिंचवड (पुणे)Thieves Gang Arrested :तामिळनाडू येथून चोरी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या आरोपींना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (theft in Pimpri Chinchwad) सकाळच्या वेळी दरवाजा उघडा असलेल्या घरातून मोबाईल, लॅपटॉप चोरी करणाऱ्या तामिळनाडूमधील एका टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली. (Pimpri Chinchwad Crime) त्यांच्याकडून 14 लाख 30 हजार रुपये किमतीचे 60 मोबाईल फोन आणि 14 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वाकड, निगडी, चिंचवड, चिखली, भोसरी, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील 23 गुन्ह्यांची उकल झाली आहे. (mobile laptop seized)

आरोपींमध्ये यांचा समावेश :गुनासेकर संकर (वय २१), तामीलारसन मादेश (वय २१, भोसरी पुणे) आणि उदयराज पालयम (ता. अंबुर, जि. वेल्लोर, तामिळनाडू) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस गस्त घालत असताना त्यांना उघड्या दरवाजावाटे चोरी करणारा एक संशयित आरोपी सापडला. त्याच्याकडे चौकशी करत इतर दोन साथीदारांना अटक केली. आरोपी तामिळनाडू येथून चोऱ्या करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात येत होते.


गुन्ह्याची पोलीस आयुक्तांकडून दखल :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सकाळच्या वेळी घरात घुसून लॅपटॉप आणि मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त प्रमाणात गस्त घालून संशयितांना ताब्यात घेऊन गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी तपास पथकातील सपोनि. संतोष पाटील आणि पोउपनि. सचिन चव्हाण यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे जास्तीत जास्त अंमलदार हे पहाटेच्या वेळी गस्तकरिता नेमून दिले.

सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद:गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला. यामध्ये तीन वेगवेगळ्या वर्णनाचे आरोपी हे वाकड हद्दीत चोऱ्या करून काळेवाडी फाटा येथूनच ते रिक्षाने पिंपरीकडे जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सपोनि. संतोष पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागातील अंमलदार यांचे वेगवेगळे ०४ पथकं तयार केले. या पथकाने भुमकर चौक, डांगे चौक, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी या ठिकाणी सापळा रचून कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले.

आरोपींची गुन्ह्याची पद्धतही न्यारी :आरोपी एक-दोन दिवस गॅप ठेवून गुन्हा करण्यासाठी येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. संशयितांचा शोध सुरू असताना काळेवाडी फाटा येथे एक जण संशयीतरित्या चालत जाताना दिसला. त्याचा चेहरा सीसीटीव्ही मधील संशयितासारखा दिसल्याने त्याला लागलीच ताब्यात घेऊन झडती घेतली. दरम्यान त्याच्याकडे ३ मोबाईल आणि २ लॅपटॉप मिळून आले. आरोपी ज्या ठिकाणी राहतात तेथे आरोपी ठरवलेल्या वेळेत परत आले नाही तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य आणि साथीदार रूम सोडून मुद्देमालासह पळून जातात अशी माहिती प्राप्त झाली. ताब्यात असलेला आरोपी कोणतेही सहकार्य करत नव्हता तसेच राहण्याचा पत्ता सांगत नव्हता. त्यामुळे तांत्रिक तपासाचा आधार घेत आरोपी भोसरी येथे राहण्यास असल्याचे निष्पन्न केले; परंतु तपास टीम भोसरी येथे पोहचण्यापूर्वी आरोपीचे साथीदार आणि कुटुंबीय पळून गेले होते. त्यांच्या मोबाईल नंबरचा तांत्रिक तपास केला असता ते मूळ गावी बेंगळुरु येथे जाणार असल्याचं निष्पन्न झालं. तपास पथकानं आरोपींच्या ट्रॅव्हल्सचा पाठलाग करीत खंबाटकी घाट, सातारा येथून अन्य दोन आरोपींना अटक केली.

चोरीचे साहित्य जप्त :या कारवाईमध्ये वाकड पोलिसांनी पिंपरी-चिंचवड शहर आणि तामिळनाडू येथून तब्बल 60 मोबाईल फोन आणि 14 लॅपटॉपसह रोख रक्कम असा एकूण 14 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत घडलेले एकूण 23 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींनी वाकड हद्दीत तसेच पिंपरी-चिंचवड मधील वेगवेगळ्या ठिकाणी घरांमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यांच्या राहत्या घरांची झडती घेतली असता त्यांचे घरामधून मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि लॅपटॉप मिळून आले. आरोपींनी चोरलेले काही लॅपटॉप आणि मोबाईल फोन मूळ गावी तामिळनाडू येथे पाठवल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर हे सर्व साहित्य जप्त केले गेले.


'या' पोलीस कर्मचाऱ्यांनी बजावले कर्तव्य:ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, डॉ. संजय शिंदे (सह पोलीस आयुक्त), वसंत परदेशी (अपर पोलीस आयुक्त), डॉ. काकासाहेब डोळे (पोलीस उप आयुक्त, परि. २ पिंपरी चिंचवड), डॉ. विशाल हिरे (सहा. पोलिस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड) यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), विठ्ठल साळुंखे (पोलीस निरीक्षक, गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि. सचिन चव्हाण, सपोफौ. बिभीषण कन्हेरकर, सपोफौ. बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. वंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दीपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोहवा. विक्रांत चव्हाण, पोहवा. अतिक शेख, पोना. प्रशांत गिलबीले, पोशि. अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. कौंतेय खराडे, पोशि. रमेश खेडकर यांनी मिळून केली आहे.

हेही वाचा:

  1. शरद पवारांनी स्वीकारलं बच्चू कडूंचं निमंत्रण, बच्चू कडू महाविकास आघाडीत?
  2. राहुल गांधींच्या 'भारत न्याय यात्रे'द्वारे काँग्रेस काय साध्य करणार?
  3. मराठा आंदोलनाचा राम मंदिर सोहळ्याशी संबंध नाही - मनोज जरांगे

ABOUT THE AUTHOR

...view details