पुणे- येथील चाकण औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रांजणगाव येथून हायर कंपनीचे वॉशिंग मशिन आणि एलईडी टीव्हीने भरलेला एक कंटेनर भिवंडी मुंबई येथे जात होता. दरम्यान, संपूर्ण ट्रक चोरट्यांनी लुटला. या टोळीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. यात ९ जणांचा समावेश आहे.
सराईत चोरट्यांची टोळी गजाआड; चाकण औद्योगिक वसाहतीत लुटला होता टीव्हीने भरलेला कंटेनर - पुणे चोरी बातमी
चाकण औद्योगिक वसाहतीतील या दरोडेखोरांच्या सराईत टोळीला अटक करण्यात चाकण पोलिसांना यश आले आहे. या दरोडेखोरांनी वॉशिंग मशिन आणि एलईडी टीव्हीने भरलेला एक कंटेनर भिवंडी मुंबई येथे जात असताना चाकण-शिक्रापूर महामार्गावर आडवून 33 लाख 65 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले होते.
हेही वाचा-सुडाचे राजकारण करु नये, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
चाकण औद्योगिक वसाहतीतील या दरोडेखोरांच्या सराईत टोळीला अटक करण्यात चाकण पोलिसांना यश आले आहे. या दरोडेखोरांनी वॉशिंग मशिन आणि एलईडी टीव्हीने भरलेला एक कंटेनर भिवंडी मुंबई येथे जात असताना चाकण-शिक्रापूर महामार्गावर अडवून 33 लाख 65 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले होते. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे. या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता जुन्या काही गुन्ह्याचाही उलगडा झाला आहे. याच आरोपींनी चाकण येथे एमआरएफ कंपनीचे 4 लाख 80 हजार रुपयांचे टायर चोरले होते. तर महिंद्रा कंपनीच्या पार्किंगमधून 1 लाख 80 हजार रुपये किमतीच्या एक्साईड कंपनीच्या बॅटरी चोरल्या होत्या. तसेच पाईट येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून त्यातील रोख रक्कमेची चोरी याच आरोपींनी केली होती. या आरोपींकडून एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. चार गुन्ह्यातील 46 लाख 75 हजार रुपये किमतींचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तसेच चोरलेले कंपनीचे टायर, बॅटरी ही या आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केले आहे.