दोन मोटारसायकलीसह चोरटा पोलिसांच्या ताब्यात
मोटरसायकल चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्यात हवा असलेल्या फरार आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बारामती तालुका परिसरात पट्रोलिंग करत होते.
बारामती (पुणे)- दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात फरार आरोपीचा शोध सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बारामती तालुक्यातील जैनकवाडी येथील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लखन कांतीलाल सूर्यवंशी (वय 28 वर्षे, रा. जैनकवाडी, बारामती), असे त्याचे नाव आहे.
मोटरसायकल चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्यात हवा असलेल्या फरार आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बारामती तालुका परिसरात पट्रोलिंग करत होते. यावेळी पथकाला खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहिती वरून बारामती तालुक्यातील जैनकवाडी येथे जाऊन पोलिसांनी लखन कांतीलाल सूर्यवंशी यास ताब्यात घेतले. पोलीस तपासात सूर्यवंशी वापरत असलेली दुचाकी मोटार सायकल चोरीची असल्याचे समजले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने आणखी एक मोटार सायकल चोरून आणल्याचे सांगितले. या पथकाने 2 मोटार सायकल व आरोपी पुढील तपास कामासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
40 हजाराच्या दोन दुचाकी केल्या जप्त
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून पोलिसांनी 20 हजार रुपये किंमतीची एक काळ्या रंगाची मोटार सायकल व 20 हजार रुपये किंमतीची एक काळे लाल पट्टे असलेली मोटारसायकल, असा एकूण 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मोटरसायकल चोरीप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा.दं.वी. कलम 379 गुन्हा दाखल करण्यात आला होता.