महाराष्ट्र

maharashtra

पुण्यात नोकरीचे आमिष दाखवून मोबाईल आणि दुचाकी चोरणारा अटकेत

By

Published : Nov 12, 2020, 12:07 PM IST

नोकरीचे आमिष दाखवून मोबाईल आणि दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची आठ वाहने आणि 11 मोबाईल जप्त केले आहेत. विलास जावळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Pune BANDGARDEN POLICE ACTION
पुणे नोकरीचे आमिष दाखवून चोरी करणारा अटकेत

पुणे -नोकरीचे आमिष दाखवून मोबाईल आणि दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची आठ वाहने आणि 11 मोबाईल जप्त केले आहेत. विलास जावळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांचा यशस्वी सापळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवकांना लोहगावमध्ये सिक्युरिटीत काम लावून देतो, रेल्वेत नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून भेटायला बोलवायचा. त्यानंतर त्यांची दुचाकी, मोबईल लंपास करायचा. काही दिवसांपूर्वी हा आरोपी पुणे स्टेशन परिसरात फिरत असल्याची माहिती कर्मचारी सागर घोरपडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विलासला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने कोंढवा, हडपसर, मार्केटयार्ड, बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 8 वाहने आणि 11 मोबाईल चोरल्याची कबुली दिली.

हेही वाचा -'कुटुंब केंद्रीत असलेले पक्ष लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका'

ABOUT THE AUTHOR

...view details