बारामती-भिगवण पोलिसांनी म्हसोबाचीवाडी येथील राहुल उर्फ अमोल मोतीराम पवार या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकत, तब्बल १० लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सराईत चोरटा मंडप व्यवसायिक आहे.
घरफोडीच्या प्रकरणात आरोपीला अटक, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
भिगवण पोलिसांनी म्हसोबाचीवाडी येथील राहुल उर्फ अमोल मोतीराम पवार या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकत, तब्बल १० लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सराईत चोरटा मंडप व्यवसायिक आहे.
आरोपीकडून मुद्देमाल जप्त
ग्रामीण भागात घरफोड्यांचे प्रमाण अधिक वाढू लागल्याने ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी कारवाईच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने भिगवण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, उपनिरीक्षक एस.बी. रुपनावर, हवालदार संदीप कारंडे, एन.एस भागवत हे दि.२३ जानेवारी रोजी म्हसोबाचीवाडी येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीचा तपास करत होते. यावेळी म्हसोबाचीवाडी येथील मंडप व्यवसायिक अमोल पवार याचे काम संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली. या झडतीमध्ये त्याच्याकडे एक सोन्याचा हार आढळून आला. या प्रकरणी त्याला भिगवण पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, त्याने घडफोडीची कबुली दिली. तसेच त्याने इंदापूर तालुक्यातील रुई येथे देखील चोरी केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.