पुणे :मुंबईला निघालेले खासदार इम्तियाज जलील यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना आरक्षण हा हक्क असल्याचा पुनरोच्चार (MIM On Muslim Reservation) केला. मुस्लिमांच्या मतावर निवडून यायचे आणि नंतर त्यांना विसरायचे ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दुटप्पी भूमीका असल्याची टीका (MP Imtiaz Jalil Criticizes Congress NCP) त्यांनी केली. राज्य सरकार (MVA Government) जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईकडे जात असताना रावेतला ते जेवणासाठी थांबले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
Imtiaz Jalil Criticizes Congress NCP : मुस्लिमांच्या मतावर निवडून यायचे आणि नंतर त्यांना विसरायचे- इम्तियाज जलील यांची टीका - MVA Government
मुस्लिम समाजाला आरक्षण (MIM On Muslim Reservation) मिळावं हा आमच्या मुद्दा आहे. हायकोर्टाने पाच टक्के आरक्षण (Five Percent Reservation For Muslim) दिले आहे. मग, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस मुस्लिम मतांवर निवडून आले आहेत. आता ते मुस्लिम आरक्षणावर बोलत नाहीत, अशा शब्दात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil Criticizes Congress NCP) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली.
मुस्लिम समाज हा केवळ निवडणुकीपूरता ठेवायचा आहे का?
खासदार जलील म्हणाले की, गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर ताफा असला असता. 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला कोरोनाचे कारण देऊन परवानगी नाकारली. मग, 11 डिसेंबरची तारीख दिली. सर्व तयारी झाल्यानंतर रात्री तुम्ही जाऊ शकत नाही, असं सांगितलं. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं हा आमच्या मुद्दा (MIM On Muslim Reservation) आहे. हायकोर्टाने पाच टक्के आरक्षण दिले (Five Percent Reservation For Muslim) आहे. मग, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस मुस्लिम मतांवर निवडून आले आहेत. सत्तेत आल्यानंतर मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत बोलत नाहीत. मुस्लिम समाज हा केवळ निवडणुकीपूरता ठेवायचा आहे का? दोन वर्षे वाट पाहिली. 2014 मध्ये भाजपला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच म्हणत होती मुस्लिमाना आरक्षण द्या! तशी ऑर्डर हायकोर्टाने दिली आहे. मग, आता सत्तेत आल्यानंतर तुम्ही तुमच रूप बदललं आहे. आज आमचा मोर्चा मुंबईला घेऊन जात आहोत, अस खासदार जलील म्हणाले आहेत.