पुणे - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. आज लॉकडाऊनचा सातवा दिवस आहे. मात्र, २३ जुलैपासून पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन नसेल पण जे निर्बंध घालण्यात आले आहे ते असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.
मिशेन बिगीन अगेन.. पुण्यात २३ जुलैनंतर लॉकडाऊन नाही..पण निर्बंध असणार - जिल्हाधिकारी - पिंपरी चिंचवड न्यूज
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. आज लॉकडाऊनचा सातवा दिवस आहे. मात्र, २३ जुलैपासून पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन नसेल पण जे निर्बंध घालण्यात आले आहे ते असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
दिवसेंदिवस पुण्यासह पिपंरी चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण वाडत आहेत. जुलै महिन्यात कोरोनाचे रुग्ण जास्त वाढले आहेत. त्यावर नियंत्रण म्हणून १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळातही उद्योग सुरू ठेवण्यात आले होते. लॉकडाऊन लोकांना त्रास देण्यासाठी नव्हता. या काळात नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. त्यामुळे या लॉकडाऊनंतर पुन्हा लॉकडाऊन असणार नाही. मात्र, या पुढील काळात देखील आजपर्यंत शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे. विनाकारण जे बाहेर फिरत आहे त्यांच्यावर निर्बंध आणण्यासाठी नवीन काही प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.