महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाकाळात पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा; मिळकत करामध्ये वाढ नाही - पिंपरी चिंचवड ब्रेकिंग न्यूज

पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यंदाच्या मिळकत करामध्ये कोणतीही वाढ होणार नाही.

pimpri chinchwad
पिंपरी चिंचवड

By

Published : Apr 1, 2021, 4:04 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मिळकत करामध्ये वाढ होणार नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार आयुक्त यांच्या अधिकारात सन २०२१- २२ या आर्थिक वर्षापासून शहरातील जुन्या मिळकतींच्या कर योग्य मुल्यामध्ये वाढ होणार होती. परंतु, कोरोना महामारीमुळे नागरिक आर्थिक परिस्थितीशी सामना करत आहेत. त्यामुळे यंदाच्या करवाढीला स्थगिती दिली आहे. महापौर ऊषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे व उपमहापौर ‍हिराबाई उर्फ नानी घुले यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आयुक्तांनी सन २०२१- २२ या आर्थिक वर्षात कुठल्याही मिळकतींना कर लादु नये अशा सुचना संबधित ‍विभागाला दिल्या आहेत.

कोरोनामुळे नागरिक हैराण झाले
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण ८ कराधान नियम मधील नियम ७ मधील तदतुदीनुसार आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात शहरातील जुन्या व नविन मिळकतींचे कर योग्य मूल्य व बिलामध्ये तफावत आहे. ही तफावत कमी करण्यासाठी सन २०२१- २२ या आर्थिक वर्षापासून जुन्या मिळकतींच्या कर योग्य मुल्याचे पुनर्मुल्यांकन करुन ते स्थायी समितीकडे अवलोकनार्थ पाठविण्यात आले होते. त्यात कोरोनाने शहरातील नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. म्हणून स्थायी समितीने शहरातील नागरिकांवर कोणत्याही प्रकारची करवाढ लादन्यात येवू नये, असे सुचविले.

शहरातील निवासी व बिगरनिवासी मिळकत धारकांना मोठा दिलासा
यापूर्वीप्रमाणे सुरू असलेली मिळकत कर आकारणी यापुढे चालू ठेवावी, असा निर्णय घेऊन आयुक्तांचा जुन्या मिळकतींच्या कर योग्य मूल्य वाढीचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यास मान्यता मिळण्यासाठी सर्वसाधारण सभेकडे सादर केला होता. त्यानुसार सर्वसाधारण सभेमध्ये सदरचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील निवासी व बिगरनिवासी मिळकत धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती महापौर महापौर ऊषा ढोरे आणि नामदेव ढाके यांनी दिली.

हेही वाचा -खुर्चीसाठी कायपण! पंचायत निवडणुकांसाठी ४५व्या वर्षी ब्रह्मचर्य तोडत केलं लग्न

हेही वाचा -मुंबईत आजपासून दोन सत्रात होणार लसीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details