महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नितीन गडकरी म्हणाले... 'माझ्या विभागात एका रुपयाचा भ्रष्टाचार होत नाही' - माझ्या विभागात एका रुपयाचाही भ्रष्टाचार होत नाही

पुणे-सातारा रस्त्याच्या कामात थोड्या अडचणी आहेत. इथले ठेकेदार सर्वात जास्त त्रास देणारे आहेत. मात्र, रस्त्याचं कामही लवकरच होईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. याच कार्यक्रमात त्यांनी माझ्या विभागात एक रुपयाचाही भ्रष्टाचार होत नसल्याचे सांगितले.

नितीन गडकरी

By

Published : Nov 16, 2019, 12:02 AM IST

पुणे -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माझ्या विभागात एका रुपयाचाही भ्रष्टाचार होत नसल्याचा दावा केला आहे. नितीन गडकरी यांच्याकडे सध्या केंद्रातील रस्ते वाहतूक खाते आहे. 2014 पासून गडकरी हे खाते सांभाळत आहेत. शुक्रवारी पुण्यात वडगाव (नवले पूल) ते कात्रज रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले... 'माझ्या विभागात एका रुपयाचा भ्रष्टाचार होत नाही'


पुणे-सातारा रस्त्याच्या कामात थोड्या अडचणी आहेत. येथील ठेकेदार सर्वात जास्त त्रास देणारे आहेत. मात्र, रस्त्याचं कामही लवकरच होईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. याच कार्यक्रमात त्यांनी माझ्या विभागात एक रुपयाचाही भ्रष्टाचार होत नसल्याचे सांगितले.

हेही वाचा -नव्याने निवडून आलेल्या आमदारांना वेतन अथवा सुविधा देऊ नयेत, राज्यपालांकडे मागणी

दरम्यान, कार्यक्रम सुरू असतानाच नेमकी लाईट गेली. तब्बल तीन ते चार मिनिटे गडकरी लाईट येण्याची स्टेजवरच वाट पाहत उभे होते. त्यानंतर लाईट आली. मग नितीन गडकरी यांनी आपलं भाषण आवरत घेतलं.

हेही वाचा -पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू


पुण्यातील वडगाव (नवले पूल) ते कात्रज रस्ता राष्ट्रीय महामार्गावरील 3.88 किलोमीटरच्या रस्त्याचे सहापदरीकरण, सेवा रस्ता बांधकाम आणि रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी 69 कोटी रुपये खर्च होणार असून काम पूर्ण होण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यात रस्त्याचे सहापदरीकरण, सेवा रस्ते, पदपथ, लहान पूल, मोऱ्या, व्हेहीक्युलर अंडर पास, पादचारी भुयारी मार्ग, नवीन बांधकाम, लहान चौक सुधारणा,बस निवारा आदी कामे करण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details