पुणे :पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले की पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे शरद पवार यांच्या घरचे आयुक्त होते. त्यांनीच तर राकेश बावधान यांना पळवले आहे. त्याच्यांच इशाऱ्यामुळे माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला : 5 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे महापालिकेच्या आवारामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांच्या वतीने हल्ला करण्यात आला होता. त्यावेळेस तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून कोणताही तपास करण्यात आला नव्हता आता या प्रकरणाची विस्तृत माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या यांनी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
35 जणांच्या विरोधात गुन्हा :राकेश बावधान यांना पळविण्यात अमिताभ गुप्ता यांचाच हात होता. त्यांनीच सही करून त्यांना पाठवले होते. हे महाराष्ट्राच्या जनतेच्या स्मरणात आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरून स्वतः च्या घरातील व्यक्ती सांगून याच अमिताभ गुप्ता यांनी पास दिले होते. त्यांना माहीत होत की, माझ्यावर हल्ला होणार आहे. तरी त्यांनी फालतू कलम लावले. या लोकांना घर बसल्या जामीन मिळाले. नवीन पोलीस आयुक्तांनी 35 जणांच्या विरोधात का गुन्हा दाखल केला? असा सवाल यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.