दौंड (पुणे) -येथील खाटीक गल्ली परिसरातील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोने, असा एकूण 1 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तर या परिसरातील आणि दौंडमधील आणखी 11 घरांचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना घडली आहे. याबाबत दौंड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे राहणारे नंदू राजाराम पलंगे यांच्या घराचे रात्रीच्या सुमारास घराचे दरवाजाचे कुलूप तोडून 15 हजारांची रोख रक्कम आणि साडेतीन तोळ्याचे गंठण, असा एकूण 1 लाख 86 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे . याबाबत नंदू राजाराम पलंगे यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.