पुणे - पुण्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आली आहे. २६ तारखेला बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन आहे. त्याचदिवशी बालगंधर्व रंगमंदिर व अन्य नाट्यगृह किमान २५ किंवा ५० टक्के क्षमतेने का होईना सुरू करावे, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.
किमान २५ किंवा ५० टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरु करावी -
गेल्या दिड वर्षांपासून कलावंतांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे.शहरात अनेक काळावंतांवर आज उपास मारीची वेळ आली आहे.कलावंत हे टाळ्यांचा भुकेले असतात. नाट्यगृह बंद असल्याने हजारो कालावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे सर्व संसार यावरच चालतात. त्यांना सावरण्यासाठी तसेच पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात हजारो सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी करणारे पुणेकर हे गेल्या दीड वर्षे कार्यक्रमांपासून वंचित आहेत. त्यांची सांस्कृतिक भूक भागत नाहीय. हे लक्षात घेऊन २६ जून रोजी बालगंधर्व रंगमंचाचा वर्धापनदिन आहे. त्या दिवसापासून तरी किमान २५ किंवा ५० टक्के क्षमतेने बालगंधर्व रंगमंदिर व अन्य नाट्यगृह सुरू व्हावे अशी विनंती राज्य शासन व पुणे महानगरपालिकेकडे आबा बागुल यांनी केली आहे.