पुणे:कात्रज-सिंहगड रोड परिसरात स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्र उभारले जाणार होणे. त्याच्या उभारणीला लॉकडाऊनचा फटका बसला आहे. त्यातच आता यासाठी महानगरपालिकेकडून जागाही उपलब्ध होत नाही, अशी माहिती हवामान विभागातील वैज्ञानिकांनी दिली. त्यामुळे पर्जन्य मापक केंद्राच्या उभारणीला मुहूर्त मिळेनासे झाला आहे.
कात्रज-सिंहगड परिसरातील स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्राला बसला लॉकडाऊनचा फटका
मागच्यावर्षी कात्रजपासून सिंहगडपर्यंतच्या परिसरात पूर आला होता. त्यात काहिंना आपले प्राण गमवावे लागले़ तर मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाले होते. या परिसरात पर्जन्यमापक केंद्र नसल्याने नेमका किती पाऊस पडला, याची कोणतीही अधिकृत मोजणी करता आली नाही. त्यामुळे या भागात स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र उभारण्याची मागणी केली गेली होती.
लॉकडाऊनमुळे स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्राच्या उभारणीचे काम होऊ शकले नाही. हवामान विभागाला शहरात जागा हवी आहे, ती मिळावी म्हणून त्यांनी पालिकेत प्रस्तावही दिला आहे. मागच्यावर्षी कात्रजपासून सिंहगडपर्यंतच्या परिसरात पूर आला होता. त्यात काहिंना आपले प्राण गमवावे लागले़ तर मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाले होते. या परिसरात पर्जन्यमापक केंद्र नसल्याने नेमका किती पाऊस पडला, याची कोणतीही अधिकृत मोजणी करता आली नाही. त्यामुळे या भागात स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र उभारण्याची मागणी केली गेली.
हवामान विभागानेही त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली. शहराच्या वेगवेगळ्या भागात १० स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला गेला. त्याला केंद्र सरकारने मान्यताही दिली. मात्र, त्याचवेळी लॉकडाऊन सुरू झाले व हे केंद्र उभारणीचे काम ठप्प झाले, अशी माहिती हवामान विभागाचे वैज्ञानिक के.एन.मोहन यांनी दिली.