पुणे- येथील प्रसिद्ध भाऊ रंगारी गणपती मंडळाची दान पेटी चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी (दि. 26) पहाटे पाऊणेतीन वाजता घडली.
चोरट्यांनी पळवली भाऊ रंगारी गणपती मंडळाची दानपेटी; घटना सीसीटीव्हीत कैद - सीसीटीव्ही
पुण्यातील प्रसिद्ध भाऊ रंगारी गणपती मंडळातील दानपेटी दोन चोरट्यांनी पळवली.
विश्रामबाग व फरासखाना अशा दोन मुख्य पोलीस ठाण्यांपासून केवळ दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या गणेश मंदिरात मंगळवारी 2 वाजून 41 मिनिटांनी दोन अज्ञात चोरट्यांनी गणपती मंदिराचे दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दानपेटी दुचाकीवरून चोरून नेली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. या प्रकरणी भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
हेही वाचा - 'बीएमडब्ल्यू' घेण्यासाठी चोरली सोनसाखळी... मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी आवळल्या मुसक्या