पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात 'रोजगार मेळा' या योजनेचा शुभारंभ झाला असून महाराष्ट्र आणि गोवा राज्यात हा कार्यक्रम पुणे, मुंबई आणि गोवा येथे झाला आहे. पुण्यातील यशदा सभागृह येथे रोजगार मेला या कार्यक्रमाचे आज शनिवार (दि. 22 ऑक्टोबर)रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपस्थित होते. यावेळी राणे यांना उद्धव ठाकरे यांच्या बद्दल विचारल असता ते म्हणाले की ठाकरे सोडून महाराष्ट्र आणि देश आहे. त्यांचे राजकारण हे मातोश्रीपुरतेच आहे असही ते म्हणाले आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुण तरुणींना नोकरी उपलब्ध व्हाव्यात म्हणून गेली 8 वर्ष प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नातून १० लाख तरुण तरुणींना नोकऱ्या द्यायच्या आहेत. त्याचा पहिला टप्पा आज आहे. शासनाच्या विविध विभागात आज नोकऱ्या दिल्या आहेत. भारतात आज सर्वत्र ७५ हजार 226 जणांना नोकऱ्या दिल्या आहेत. आज ज्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत त्याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो असे देखील यावेळी राणे म्हणाले आहेत.
राज्यात सध्या दिवाळीच्या शिधा वाटपावरून राजकारण केले जात आहे. यावर राणे यांना विचारले असता ते म्हणाले, की मला अस वाटत आहे की चांगल ते पाहावे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तरुणांच्या जीवनात एक आनंद मिळवून दिला आहे. ज्यांना आज नोकऱ्या मिळाल्या आहे. त्यांना आनंद आहे. त्यांच्या घरात आनंद आहे. राज्यात जर कोणी राजकारण करत असेल तर दिवाळी निमित मी काही बोलणार नाही. असे देखील यावेळी राणे म्हणाले.