पुणे - आता भारतात 'स्पुटनिक व्ही' या लसीचे उत्पादन होणार आहे. या लसीची निर्मिती पुणे येथील सीरम ही संस्था करणारा आहे. स्टुटनिक व्ही ही लस निर्मितीची परवानगी मिळावी यासासाठी सीरम संस्थेचे काही दिवसांपासून प्रयत्न चालले होते. त्या प्रयत्नांना आता यश आले आहे. काही नियम आणि अटींच्या आधारे, 'डीसीजीआई'ने सीरम संस्थेला भारतात स्पुटनिक व्ही लस बनवण्याची परवानगी दिली आहे.
भारतात होणार 'स्पुटनिक व्ही' लसीचे लवकरच उत्पादन, सीरम संस्थेला मिळाली परवानगी
आता भारतात स्पुटनिक व्ही या लसीचे उत्पादन होणार आहे. या लसीची निर्मिती पुणे येथील सीरम ही संस्था करणार आहे. काही नियम आणि अटींच्या आधारे, 'डीसीजीआई'ने सीरम कंपनीला भारतात स्पुटनिक व्ही लस बनवण्याची परवानगी दिली आहे.
'गमलेया रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायेलॉजी'सोबत भागेदारी
सीरम संस्था या अगोदर कोविड लस (Covishield) ची निर्मिती करत होती. त्याच संस्थेने आता रशियामध्ये निर्मिती करण्यात येणारी स्पुटनिक व्ही लस निर्मिती करण्याची परवानगी मिळवली आहे. यासाठी सीरमने औषध महानियंत्रक मंडळाकडे परवानगी मागीतली होती. सीरम ही संस्था पुणे येथील हडपसरमधील आपल्या संस्थेत ही स्पुटनिक व्ही या लसीची निर्मिती करणार आहे. तसेच, निर्मितीमध्ये मॉस्को येथील 'गमलेया रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायेलॉजी' ही संस्था आणि सीरम हे लस निर्मितीचे सोबत काम करणारा आहेत.