महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना नियमांचे पालन करत पुण्यातील शनिवार वाडा पर्यटकांसाठी खुला - शनिवार वाडा पुणे बातमी

पुण्यातील शनिवार वाडा आजपासून सुरू करण्यात आला आहे. ऑनलाइन तिकिट विक्री सुरू असून कोरोना बाबातच्या सर्व नियमांचे पालक करत पर्यटकांनी हजेरी लावली आहे.

शनिवार वाडा
शनिवार वाडा

By

Published : Jan 6, 2021, 4:32 PM IST

पुणे- तब्बल 9 महिन्यानंतर पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा आजपासून (दि. 6 जाने.) पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. ऑनलाइन तिकीट, थर्मल स्कॅनिंग, मास्क अशी सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.

मार्च महिन्यांनंतर सुरू होत आहे शनिवार वाडा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे 25 मार्चपासून पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा बंद करण्यात आला होता. देशात सर्व पूर्ववत होत असल्याने पर्यटन स्थळेही सुरू करावीत, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. त्यानंतर कोरोनाबाबतची सर्व खबरदारी घेत शनिवार वाडा सुरू करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन तिकीट

आढावा घेताना प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार वाडा येथे आता ऑनलाइन तिकिटाची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवार वाडा येथील पाटांगणातच स्कॅनिंग ठेवण्यात आले आहे. पर्यटकाने ऑनलाइन स्कॅन करून तिकीट घेतल्यावर त्या पर्यटकाचे फाटकावरच तापमान मोजण्यात येत असून तापमान व्यवस्थित असल्यास पर्यटकाला आत सोडले जात आहे. विना मास्क पर्यटकांना प्रवेश देण्यात येत नाही. दरोरोज सकाळी 9 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत शनिवार वाडा पर्यटकांसाठी खुला असणार आहे.

पहिल्याच दिवशी गर्दी

शनिवार वाडा सुरू झाल्याचे कळताच सकाळपासून पुणेकर व पुण्याबाहेरील पर्यटकांनी शनिवार वाडा पाहण्यासाठी गर्दी केली होती. पर्यटकही योग्य ती खबरदारी घेत आहेत.

हेही वाचा -जिजामाता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे पुण्यनगरी...

हेही वाचा -ईडी कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर अ‌ॅड. सरोदेंची नाराजी

ABOUT THE AUTHOR

...view details